Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रअधिवेशन काळात शिवसेना आमदारांची होते हजेरी….

अधिवेशन काळात शिवसेना आमदारांची होते हजेरी….

मुंबई : अधिवेशन काळात शिवसेना आमदारांनी नित्यनेमाने दररोज अधिवेशनात हजर राहावे यासाठी शिवसेना आमदारांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात दररोज हजेरी घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

एका न्यूज पोर्टलने याबाबत दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आमदारांची दररोज हजेरी घेतल्या जात आहेत. हजेरी घेण्याची जबाबदारी आमदार अजय चौधरी आणि आमदार रमेश कोरगावकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

- Advertisement -

तसेच हजेरीचा तपशील संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांना दिला जातो तसेच पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतची माहिती घेत असल्याचे समजते.

24 फेब्रुवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. आणखी चार आठवडे हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाची सुरूवात होण्यापुर्वीच महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे. अशी तंबीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिली होती.

मुख्यमंत्र्यांच्या या आदेशावरूनच शिवसेनेच्या आमदारांची हजेरी सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर घेतली जात आहे. दरम्यान, आतापर्यंततरी अधिवेशन काळातील शिवसेना आमदारांची उपस्थिती समाधानकारक असलायचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या