न्यायालयात जाऊ, पण शिवसेनेचा एक सदस्य स्थायीवर पाठवणारच -अजय बोरस्ते
स्थानिक बातम्या

न्यायालयात जाऊ, पण शिवसेनेचा एक सदस्य स्थायीवर पाठवणारच -अजय बोरस्ते

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाल संपल्याने आज स्थायी समितीच्या नव्या सदस्यांची निवड पार पडली. यावेळी भाजप, सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीने कोट्यानुसार नव्या सदस्यांची यादी महापौरांकडे पाठवली होती.

यंदा शिवसेनेचे संख्याबळ वाढल्यामुळे शिवसेनेने एका सदस्याचे नाव वाढीव पाठवले होते. मात्र, महापौरांनी शिवसेनेच्या तीनऐवजी दोन सदस्यांच्या नावांची घोषणा करत  महासभा गुंडाळली.


यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला. महापौरांनी राष्ट्रगीत घेत महासभा आटोपती घेतली. यानंतर शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते म्हणाले की, शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढल्याने अजून एक सदस्य सेनेचा स्थायीवर जायला हवा असताना, केवळ दोन सदस्यांच्या नावाची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी करून महासभा गुंडाळली.

यानंतर स्थायी समिती सदस्य निवडीवरून महापालिकेत प्रचंड गोंधळ बघावयास मिळाला. शिवसेना न्यायालयात जाऊन न्याय मिळवेल व तिसरा सदस्य स्थायीवर पाठवणारच असल्याचे बोरस्ते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com