ठाकरे सरकार त्यांच्या कर्माने पडणार – विनायक मेटे यांचा घणाघात
स्थानिक बातम्या

ठाकरे सरकार त्यांच्या कर्माने पडणार – विनायक मेटे यांचा घणाघात

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

या सरकारने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे. कर्जमाफी तुटपुंजी केली यामुळे राज्यातले ठाकरे सरकार त्यांच्या कर्माने कोसळणार असल्याची टीका शिवसंग्राम पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विनायक मेटे यांनी केली. ते नाशिक दौऱ्यावर असून शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली नाही. अतिवृष्टी बाधितांना २५ हजार मदत दिली गेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन पुरात वाहून गेले.

या सरकारमध्ये एकवाक्यता नाही. एनआरसीला विरोध तर सीएएला पाठिंबा याबाबत तिन्ही पक्षांचे मतभेद आहेत. या सरकारचा कारभार म्हणजे बनवा बनवी सुरु आहे.

हे तिन्ही पक्ष ऐकमेकांना बनवा बनवि करून महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे काम करत आहेत. शिवसेनेने तिथीनूसार नव्हे तर तारखेनुसार शिवजयंती साजरी करावी अशी मागणीदेखील यावेळी मेटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com