Video : शिवजयंती मिरवणुकीला नाशकात प्रारंभ; सीएए आणि एनआरसीला समर्थन
स्थानिक बातम्या

Video : शिवजयंती मिरवणुकीला नाशकात प्रारंभ; सीएए आणि एनआरसीला समर्थन

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नाशिकमधील वाकडी बारव येथून शिवजयंती मिरवणुकीला प्रारंभ झाला. केंद्र सरकारने घेतलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ फलकबाजी केलेली दिसून आली. साहसी खेळ सादर करत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक मार्गस्थ झाली आहे.

शिवजयंती उत्सवाच्या मिरवणूकीला शहरातील विविध भागातील पाच मंडळांनी नोंदणी केली आहे. यामध्ये छत्रपती सेना, स्वराज्य प्रतिष्ठाण इंदिरानगर, शिवसाई फेन्ड सर्कल डिंगर आळी, अर्जुन क्रिडा मंडळ व्दारका, गजानन महाराज मंडळ आदिनी परवानगी घेतली आहे.

तर 40 मंडळानी जागे वरच शिवजयंती साजरी करण्याची परवानगी घेतली आहे. डीजे ला बंदी असली तरी रात्री बारा वाजेपर्यंत शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मिळाल्याने शिवप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Deshdoot
www.deshdoot.com