आमदारांनी लाडूदमध्ये आश्रमशाळेतील मुलांसोबत केली शिवजयंती साजरी
स्थानिक बातम्या

आमदारांनी लाडूदमध्ये आश्रमशाळेतील मुलांसोबत केली शिवजयंती साजरी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

आज सर्वत्र शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी आज सकाळी लाडूद आश्रम शाळेचा विद्यार्थ्यांसोबत आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.

आदिवासी विद्यार्थ्यांना शिवकालीन पेहराव उपलब्ध करून देत स्वतःच्या घरी विद्यार्थ्यां समवेत शिवजयंती साजरी केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आमदार बोरसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कथन करत सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. यावेळी आमदार दिलीप बोरसे यांच्या पत्नी संगीता बोरसे, बंधू दौलत बोरसे आदींसह लाडूद आश्रम शाळेचे शिक्षक,विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com