‘श्रीं’चा पालखी सोहळा रद्द
स्थानिक बातम्या

‘श्रीं’चा पालखी सोहळा रद्द

Balvant Gaikwad

कोरोना महामारीचे संकट पहाता गेल्या ५२ वर्षापासुन सुरु असलेला आषाढी वारी पालखी सोहळा या वर्षों रहीत करण्यात आल्याची माहिती श्री संत गजानन महाराज संस्थानदारे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाव्दारे
देण्यात आली आहे.
या प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे की, जागतिक कोरोना संकट ओढवले आहे. सर्वच हतबल झाले आहेत. वारीच्या प्रसंगी सर्व अडचणी लक्षात घेता, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संस्थानची कायम शाखा झाली आहे.
श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन नित्य पूजाअर्चा, सोपस्कार व नियमाप्रमाणे कार्यक्रम केल्या जातात. पंढरीनाथांच्या चरणो नित्य सेवा भक्तिभावाने कायम होत आहे. त्यामुळे श्री पालखी सोहळा रहित करण्यात आला आहे.
अशाप्रसंगी श्री पालखी (श्री पादुका) पंढरपुरास नेणे उचित ठरणार नसल्याचे व्यवस्थापकिय विश्वस्त यांनी या पत्रकात म्हटले आहे.
Deshdoot
www.deshdoot.com