संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमामध्ये वेगळं वातावरण निर्माण केलं
स्थानिक बातम्या

संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमामध्ये वेगळं वातावरण निर्माण केलं

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

शरद पवार यांचा पत्रकार परिषदेत घणाघात

मुंबई | प्रतिनिधी 

कोरेगाव-भीमा येथे विजय स्तंभाच्या दर्शनासाठी लोक जमा व्हायचे. मात्र स्थानिक आणि बाहेरुन येणाऱ्या लोकांनामध्ये कधीच कटुता निर्माण झालेली नव्हती. मात्र संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमामध्ये वेगळ वातावरण तयार केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पवार म्हणाले, कोरेगाव-भीमाच्या लढाईमध्ये काही भारतीय ब्रिटिशांच्या बाजूने लढले आहेत. या लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला हेच वास्तवर आहे. एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा या दोन वेगवेगळया घटना आहेत. एल्गार परिषदेमध्ये 100 पेक्षा जास्त संघटना सहभागी झालेल्या होत्या.

‘कोरेगाव-भीमा येथे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यक्रम सुरु आहे. दरवर्षी लोक जमतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिथे जाऊन आले. यानंतर तिथे जाणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र संभाजी भिडे यांनी त्या ठिकाणी एक वेगळे वातावरण निर्माण केलं गेलं. त्यात नक्की काय झालं ते चौकशीत बाहेर येईलच असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com