शंकरराव गडाख कॅबिनेट तर प्राजक्त तनपुरे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ
स्थानिक बातम्या

शंकरराव गडाख कॅबिनेट तर प्राजक्त तनपुरे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

Sarvmat Digital

नगर जिल्ह्याला महाविकास आघाडी मंत्रिमंडळात झुकते माप

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्याच्या महाविकास आघाडी मंत्रिमंडळात नगर जिल्ह्याला झुकते माप मिळाले आहे. सोमवारी विस्तारात नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी कॅबिनेट तर राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे नगरच्या वाट्याला दोन कॅबिनेट तर 1 राज्यमंत्रीपद आले आहे. विशेष म्हणजे सत्तेतील तीनही पक्षांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे.

सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. एकूण 36 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. यात नगर जिल्ह्यातून नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रीपदाची तर राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पहिल्याच शपथविधीला मंत्रिमंडळात समावेश झाला होता. त्यांच्याकडे महसूल हे महत्त्वाचे खाते आहे.

सहकार क्षेत्रातून अनेक मातब्बर नेते देणार्‍या नगर जिल्ह्याला यापूर्वीही मंत्रिमंडळात अनेकदा चांगला सहभाग मिळाला आहे. मात्र भाजपा सरकारमध्ये जिल्ह्याला एकच मंत्रीपद मिळाले होते. मात्र आता नव्या सरकारमध्ये पुन्हा एकदा नगर जिल्ह्याला पुन्हा एकदा राजकीय ताकद मिळाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com