खालापूरजवळ कार अपघातात शबाना आझमी जखमी
स्थानिक बातम्या

खालापूरजवळ कार अपघातात शबाना आझमी जखमी

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

मुंबई :

अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारला आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात झाला असून  त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एक्स्प्रेस वेवर एका ट्रकला मागून शबाना आझमी यांची कार धडकली आणि हा अपघात घडला. कारमध्ये चालक, शबाना आझमी यांच्यासोबत जावेद अख्तरसुद्धा होते. मात्र अपघातात त्यांना कोणताही इजा झालेली नाही.

कारचालकसुद्धा जखमी झाला आहे. शबाना यांच्या कारची ट्रकवर मागून धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com