एकुलत्या एक मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; वडझिरे येथील घटना
स्थानिक बातम्या

एकुलत्या एक मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; वडझिरे येथील घटना

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

वडझिरे | वार्ताहर

वडझिरे येथील १७ वर्षीय मुलाचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. तरुण मुलगा विजेच्या धक्क्याने दगावल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती अशी की, वडझिरे येथील उदय ञानेश्वर बोडके (वय १७) या तरुण गावाची यात्रा असल्याने वडझिरे येथे आपल्या घरी आला होता. घराची सापसफाई करत असताना विजेचा बल्ब खाली असल्याने तो साफ करत असताना बल्ब खाली पडला होता. हा बल्ब पुन्हा होल्डरमध्ये बसवत असताना उदयला विजेचा धक्का बसला.

या घटनेत उदयचा जागीच मृत्यू झाला. घरात किंवा शेजारी कोन्हीही नसल्याने  ही घटना कुणाच्याही लक्षात आली नाही. थोड्याच वेळात याठिकाणी उदयचे काका अशोक बोडके हे घरी परतले.

त्यांनी तात्काळ उदय यास शिंदे तसेच नाशिकरोड येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.

उदयचे वडील नायगाव येथील टी. एस. दिगोळे विद्यालयात शिक्षक आहेत. तर उदय 11 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. अत्यंत हुशार व लाडका एकूलता एक मुलगा असल्याने वडझिरे तसेच पंचक्रोषित हळहळ व्यक्त केली जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com