धुळे : जिल्ह्यात आणखी सात रुग्ण पॉझिटीव्ह
स्थानिक बातम्या

धुळे : जिल्ह्यात आणखी सात रुग्ण पॉझिटीव्ह

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

दोघा महिलांचा मृत्यू, धुळे व चिमठाण्यात अंत्यसंस्कार, जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६२

शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असून आज पुन्हा सात रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या 62 झाली आहे. याशिवाय भांडूप येथील सहा जखमी बाधित झाले असून त्यांच्यावर धुळ्यात उपचार सुरु आहेत. दरम्यान सोमवारी रात्री बाधित दोन महिलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर धुळे व चिमठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्या आता आठ झाली आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना कक्षात उपचार घेणार्‍या नगावबारी (धुळे) व चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील महिलेचा काल रात्री मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्या आठ झाली आहे. दरम्यान नगावबारी येथील महिलेवर धुळ्यात तर चिमठाणेतील महिलेवर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

सात रुग्णांची भर

येथील वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आज सात रुग्ण बाधित आढळून आल्याने जिल्ह्यात सद्य:स्थितीत बाधितांची संख्या 62 झाली आहे. यात शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील दोन महिलांचा समावेश असून उर्वरीत बाधित धुळे शहरातील रहिवासी आहेत. दाखल असलेल्या रुग्णांपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर तर 29 जणांची स्थिर आहे. आतापर्यंत 18 जणांनी कोरोनावर मात केलेली आहे.

दरम्यान दि. 8 मे रोजी जिल्ह्यात तब्बल 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात नगावबारी व चिमठाणे येथील दोन महिलांचा देखील समावेश होता. दोघा महिलांवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. काल रात्री नगावबारी येथील 40 वर्षीय व चिमठाणे येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्या आठ झाली आहे. नगावबारी येथील महिलांवर आज दुपारी शासकीय नियमानुसार शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर संबंधित रुग्णवाहिकेचे मनपा कर्मचार्‍यांनी निर्जंतूकीकरण केले.

Deshdoot
www.deshdoot.com