जळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले सात पॉझिटिव्ह रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले सात पॉझिटिव्ह रुग्ण

जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या ३९ कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल मंगळवारी दुसर्‍या टप्प्यात रात्री प्राप्त झाले. यापैकी ३२ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सात रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये पाचोरा एक, जळगाव दोन, तर भुसावळच्या चार रुग्णांचा समावेश आहे.  यात पाचोरा येथील २१ वर्षीय तरुणाचा, जळगाव शहरातील शांतीनगर येथील ५१ वर्षीय व श्रीरामनगरातील ६३ वर्षीय पुरुषाचा, भुसावळ येथील ५८, ६०, ७० वर्षीय पुरुषांचा, तर ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

तसेच अमळनेर येथील यापूर्वीच कोरोना बाधित आढळून आलेल्या एका ५८ वर्षीय पुरुषाचा १४ दिवसानंतरचा तपासणी अहवालही पॉझिटिव्ह   आला आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १९० इतकी झाली असून त्यापैकी पंचवीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकोणतीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com