जळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले सात पॉझिटिव्ह रुग्ण
स्थानिक बातम्या

जळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले सात पॉझिटिव्ह रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण ५२, एकूण १३ रुग्णांचा मृत्यू  

येथील कोविड रुग्णालयात सात रुग्णांचे तपासणी अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५२  झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली.

या रुग्णालयात स्वॅब घेतलेल्या ७६ कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६८ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. एका संशयित रुग्णाचा अहवाल रिजेक्ट करण्यात आला आहे. तर सात व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

या सात रुग्णांमध्ये एक ४० वर्षीय पुरुष हा अजिंठा चौफुली, जळगाव येथील, एक ६५ वर्षीय पुरूष हा अडावद (ता. चोपडा), दोन रुग्णांमध्ये २४ वर्षीय महिला व ३० वर्षीय पुरुष हे पाचोरा येथील, तर अमळनेर येथील तीन रुग्णांमध्ये १३ व २३ वर्षांचे तरुण आणि १६ वर्षीय तरुणीचा देखील समावेश आहे. यापैकी जळगाव येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५२  झाली आहे. त्यापैकी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मेहरुणमधील रुग्ण बरा झाल्याने त्यास या अगोदरच रुग्णालयातून घरी सोडले आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली.

Deshdoot
www.deshdoot.com