धुळे : जिल्ह्यात आणखी सात रुग्णांची भर

धुळे : जिल्ह्यात आणखी सात रुग्णांची भर

धुळ्यात पाच तर शिरपूरात दोन,बाधितांचा आकडा 325

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून बाधितांची संख्या वेगाने वाढते आहे. आज पुन्हा सात रुग्णांची भर पडल्याने कोरोना बाधितांचा जिल्ह्यातील आकडा 325 वर पोहचला आहे. आज धुळे शहरात पाच तर शिरपूरात दोन रुग्णांची वाढ झाली.

धुळे शहरा पाठोपाठ शिरपूर कोरोना विषाणूच्या दृष्टीने हॉटस्पॉट बनले आहे. आज अखेर शिरपूरातील बाधितांची संख्या 81 झाली असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर धुळे शहरातील कोरोना बाधित असणार्‍या रुग्णांचा आकडा 186 वर पोहचला आहे. आतापर्यंत 131 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर जिल्ह्यात 27 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आज शहरातील आढळून आलेल्या पाच रुग्णांमध्ये जुन्या धुळ्यातील दोन, देवपूर दत्त मंदिर परिसरातील एक, वाडीभोकर रस्त्याच्या रामनगर परिसरातील एक आणि मध्यशहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. तर शिरपूरातील अंबिका नगर आणि शिरपूर शहरातील दोघे पॉझेटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांची वाढतील संख्या विचारात घेवून प्रशासनाने याआधिच काही संस्थांच्या इमारती कॉरंटाईन सेंटरसाठी अधिग्रहीत केल्या आहेत.

तर दोन दिवसांपासून हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात केवळ कोरोना बाधित आणि संशयितांवर उपचार होत असून अन्य आजारांच्या रुग्णांसाठी मोराणे शिवारातील ए.सी.पी.एम. रुग्णालय खुले करण्यात आले आहे.

धुळे शहर 186

धुळे तालुका 05

साक्री तालुका 20

शिंदखेडा तालुका 27

शिरपूर तालुका 81

जिल्हा बाहेरील 17

बरे झालेले रुग्ण 131

एकूण 325

आजपर्यंत मृत्यू 27

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com