सप्तशृंगी गडावर फडकली चैत्रोत्सवाची कीर्तीध्वजा; पाचशे वर्षे जुनी परंपरा अविरत सुरु

सप्तशृंगी गडावर फडकली चैत्रोत्सवाची कीर्तीध्वजा; पाचशे वर्षे जुनी परंपरा अविरत सुरु

सप्तशृंगी गड | वार्ताहर 

लॉकडाऊनचा फटका सर्वच प्रमुख देवस्थानांना बसला आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्य शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावरील यंदाचा चैत्रोत्सवही रद्द झाला आहे. मात्र, चैत्रोत्सवाच्या निमित्ताने गेल्या पाचशे वर्षांची वर्षांची परंपरा असलेला कीर्तीध्वज मंगळवारी रात्री गडाच्या माथ्यावर फडकविण्यात आला.

देवस्थान ट्रस्टकडून दरेगाव येथील एकनाथ गवळी, त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य, ट्रस्टचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कीर्तीध्वजाची सालाबादाप्रमाणे विधिवत् पूजा करण्यात आली.

65 वर्षीय एकनाथ गवळी यांनी गडाला प्रदक्षिणा घालून कीर्तीध्वज गडाच्या व देवीच्या माथ्यावर  फडकवला. ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी सोशल डिस्टन्सचा नियम पाळण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारामुळे संपुर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे सर्व धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम रद्द असल्यामुळे  सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने ध्वजाच्या मानकर्यांच्या उपस्थित किर्तीध्वजा फडकविण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com