संजीवनगर, वडाळागाव परिसर, पेठरोड पंचवटी ‘हॉटस्पॉट’
स्थानिक बातम्या

संजीवनगर, वडाळागाव परिसर, पेठरोड पंचवटी ‘हॉटस्पॉट’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

देशभरात करोना आकडा वाढतच असुन राज्यातील मुंबई, पुणे येथील रुग्णांचा आकडा चिंतेचा बनला आहे. नाशिक शहरातील आकडा हा शंभरी पार करुन 129 पर्यत पोहचला आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रातील आकडा तीन दिवसात अर्धाशतकाच्या वर गेला असुन यामुळे शहरातील संजीवनगर शिवार, वडाळागांव, वडाळानाका परिसर, पेठरोड पचवटी यासह असे 8 करोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या हॉटस्पॉट भागात गेल्या चार पाच दिवसात 59 करोना रुग्ण आढळून आले असुन याभागात हॉटस्पॉट बनलेल्या भागात 125 वर अति जोखमीच्या व्यक्ती आहे. यामुळे नाशिककरांची चिंता वाढली.

शहरातील सातपूर अंबड लिंकरोड भागात असलेल्या संजीवनगर भागात 16 एप्रिल रोजी एका वृध्देला करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या महिलेचा मुलगा नोकरीनिमित्त मुंबईला असतांना तो घरी आल्याने तिला बाधा झाली होती. यानंतर या महिलेच्या घरातील चार जणांना बाधा होऊन एकाच कुटुंबातील 5 जणांना करोना झाल्याचे प्रथमच समोर आले होते. पुढच्या काळात हे पाचही जणांनी करोनावर मात दिली.

त्यानंतर याच संजीवनगर शिवारातील प्रभात वसाहतीतील व्यक्तीचा मुंबईहून अत्यंसंस्काराहून परतल्या नंतर 19 मे रोजी मृत्यु झाला. यामृताच्या संपर्कात आलेले आत्तापर्यत 15 जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले. अशाप्रकारे संजीवनगर हा परिसर आता हॉटस्पॉट बनला आहे. यामुळे या भागाला प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात आले असुन याचा कालावधी आता 9 जुनपर्यत वाढला गेला आहे.

यानंतर वडाळागांव भागातील मुंबई – नाशिक असा प्रवास करणार्‍या एक चालकास करोना झाल्याचे समोर 18 मे रोजी समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एक युवक व महिलेला बाधा झाली होती. नंतर वडाळागांव लगत असलेल्या मुमताझनगर भागात एक करोना बाधीत आढळल्यानंतर याच व्यक्तींच्या संपर्कातील 8 जणांना करोना झाल्याचेे समोर आले.

नंतर काझीगढी लगत असलेल्या नाईकवाडीपुरा भागातील एका महिलेला करोना झाल्यानंतर तिच्या कुटुंबातील 5 जणांना करोना झाल्याचे समोर आले. त्याचबरोबर शिवाजीवाडी भारतनगर येथील एका किराणा दुकानदाराला बाधा झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील आलेल्या 4 जणांना करोना झाला आहे. अशाप्रकारे वडाळागांव व वडाळानाका भागात एकुण 15 जणांना करोनाची बाधा झाल्याने हा परिसर करोना हॉटस्पॉट बनला आहे.

तसेच नाशिक शहरातील सर्वाधिक हॉटस्पॉट असलेल्या संजीवनगर मधील मृत व्यक्तीच्या अंतयसंस्काराला गेलेल्या पंचवटीतील दिंडोरीरोड शनिमंदिराजवळ रामनगर भागातील एक व्यक्तीला करोना झाल्याचे समोर आले होते. या व्यक्तींचा मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला करोना झाल्याचे अहवालातून समोर आले होते. यानंतर 25 मे रोजी याच मृताच्या संपर्कात आलेल्या 13 जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले.

तसेच या भागात असलेल्या नाशिक मार्केट यार्डात करोनाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. याठिकाणी ये जात करणार्‍या आणि जवळच हॉटेल चालविणार्‍या व्यक्तीस करोना झाल्याचे समोर आले आणि क्रांतीनगर पचंवटीत राहणारा आणि मार्केट यार्डात काम करणार्‍या व्यक्तीस करोना झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील एकाला बाधा झाली आहे.

तसेच मार्केट कमेटीजवळ हॉटेल चालकांस करोना झाल्यानंतर त्यांच्या कुटुबातील तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे आता रामनगर पेठरोड, क्रांतीनगर मार्केट यार्ड हा परिसर हॉटस्पॉट बनले आहे. यामुळे आता महापालिका प्रशासनाला अधिक सतर्क राहुन उपाय योजना कराव्या लागणार आहे.

हॉटस्पॉट क्षेत्र अतिजोखमीच्या कमी जोखमीच्या व्यक्ती रुग्ण

प्रभात संजीवनगर 67, 40, 10
रामनगर पंचवटी 28, 15, 15
मुमताझनगर वडाळा 14, 18, 11
नाईकवाडीपुरा व.नाका 5, 11, 5
वडाळागांव 6, 37, 3
शिवाजीवाडी भारतनगर 12, 19, 4

Deshdoot
www.deshdoot.com