चलो अयोध्या…उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार; संजय राऊत यांचे ट्विट
स्थानिक बातम्या

चलो अयोध्या…उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार; संजय राऊत यांचे ट्विट

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई | प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहेत. येत्या ७ मार्च रोजी उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन ते घेणार आहेत तसेच ते शरयू नदीची आरतीदेखील सायंकाळी करणार आहेत. याबाबतची अधिकृत माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटरद्वारे दिली.

ट्विटमध्ये संजय राऊत म्हणाले, चलो अयोध्या…7 मार्च मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येत जाणार! दुपारी  दुपारी श्रीराम दर्शन त्यानंतर  संध्याकाळी शरयू आरती  होणार आहे. या ऐतिहासिक सोहोळ्यात सामील व्हा असे आवाहन शिवसैनिकांना खा. राऊत यांनी केले आहे.

कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांच्यासह दिग्गजांची भेट ठाकरे यांनी घेतली. दरम्यान, यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे ट्विट खा. राऊत यांनी केल्यामुळे भाजपला धक्का मानला जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com