अबब! 12 हजारांनी स्वस्त झाला सॅमसंग गॅलेक्सी एस10 स्मार्टफोन
स्थानिक बातम्या

 अबब! 12 हजारांनी स्वस्त झाला सॅमसंग गॅलेक्सी एस10 स्मार्टफोन

Gaurav Pardeshi

दिल्ली :

सॅमसंग कंपनी कडून गॅलेक्सी स्मार्टफोनची नवी सिरीज लाँच करण्यात आली आहे. दरम्यान, सॅमसंग गॅलेक्सी S10 सिरीज मध्ये तब्बल १२ हजारांची भरगोस सुट देण्यात आली आहे. या सिरीजमध्ये गॅलेक्सी S10, गॅलेक्सी S10+ आणि गॅलेक्सी S10e हे तीन स्मार्टफोन्सचा समावेश होतो.

गॅलेक्सी S10 आणि S10+ यांच्या किंमतीत 12 हजार रुपये आणि गॅलेक्सी S10eच्या किंमतीत 8 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. ह्या नव्या किंमती ऑनलाइन स्टोअरवर लवकरच लागू होणार आहे. कपातीनंतर सॅमसंग गॅलेक्सी 10च्या 128जीबी स्टोरेज व्हेरींअंट किंमत 54 हजार 900 रुपये आणि 512जीबी स्टोरेज व्हेरींअंटची किंमत 59 हजार 900 रुपये झाली आहे. हा फोन 66 हजार 900 रुपयांच्या बेसिक किंमतीसह लाँच करण्यात आला होता.

तसेच, गॅलेक्सी S10+च्या 128 जीबी स्टोरेजची किंमत 73 हजार 900 रुपयांनी कमी होऊन 61 हजार 900 रुपये झाली आहे. या व्यतिरिक्त  गॅलेक्सी S10e या फोनच्या किंमतीतही 8000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता हा फोन 55 हजार 900 रुपयांऐवजी 47 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Deshdoot
www.deshdoot.com