ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर काळाच्या पडद्याआड
स्थानिक बातम्या

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर काळाच्या पडद्याआड

Sarvmat Digital

मुंबई | प्रतिनिधी 

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी निधन झाले. काल (दि. २९) मध्यरात्री त्यांची तब्बेत अचानक बिघडली होती. त्यांना मुंबईतील एचएन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

67 वर्षीय ऋषी कपूर हे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ऋषी कपूर यांच्या निधनाची माहिती अभिनेते बिग बी यांनी ट्विट करून दिली होती. कालच इरफान खान याचे अकाली निधन झाल्यानंतर आज पुन्हा ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी सकाळीच माहिती आल्यामुळे बॉलीवूड शोकसागरात बुडाले आहे.

अनेक कलाकारांनी सोशल मीडियात शोक व्यक्त करत, ऋषी कपूर यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत श्रद्धांजली वाहिली. १९७२ मध्ये बॉबी चित्रपटापासून आपल्या अभिनयाची सुरुवात ऋषी कपूर यांनी केली होती.

भारतीय सिनेमा सृष्टीला दिलेले उत्कृष्ट अनेकानेक चित्रपट त्यांनी दिले. ७० च्या दशकाचे चॉकलेट हिरो, शैलेंद्र आणि किशोर कुमार यांच्या गाण्यांना त्यांनी आपल्या नृत्य आणि अभिनयाने हिट केले होते. अष्टपैलू अभिनेता गमावल्याची खंत अनेक ज्येष्ठ कलाकारांनी व्यक्त केली आहे.

https://twitter.com/SrBachchan/status/1255709029336322048?s=19

Deshdoot
www.deshdoot.com