हुश्श…चाळीसगावच्या २० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
स्थानिक बातम्या

हुश्श…चाळीसगावच्या २० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Balvant Gaikwad

चाळीसगाव येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेणारा अमोदे,ता.नांदगाव येथील ५५ वर्षीय पुरुष नाशिक येथे कोरोना पॉझिटिव निघाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

कोरोना बांधित रुग्णाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन शहरातील डॉक्टारांसह २० जणांना क्वारंटाईन करण्यात आले. तसेच सर्वांचे सॅब घेवून ते धुळे येथे तपासणी पाठविण्यात आले होते. त्याचा तपासणीचा अहवाल आज आला असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय आधिकारी डॉ. डी.डी.लांडे यांनी दिली आहे.

शहरातील करगावरोडस्थित मध्ये आमोदे ता.नांदगाव, नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुष उपचारासाठी दाखल होऊन गेला असून त्याला नाशिक येथे तपासणीत कोरोना झाल्याचे निषन्न झाले. यामुळे तालुक्यातील वैद्यकिय यंत्रणा हादरली होती. मंगळवारी त्या हॉस्पिटल मधील एक डॉक्टर, रुग्ण, रुग्णालयातील स्टॉप व लॅब मधील कर्मचारी, अशा तब्बल २० जणांचे स्वॅब घेवून ते तपासणी धुळे येथे पाठविण्यात आले होते.

सर्वांचे स्वॅब तपासणीचा अहवाल आज जिल्हाप्रशासनास प्राप्त झाला असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे चाळीसगावकरांच्या जीवात जीव आला आहे. तरी देखील सर्वांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन रहावे लागणार आहे.

चाळीसगावच्या चौहबाजून कोरोनाने वेढा दिला आहे. परंतू चाळीसगाव कोरोनाचा आतापर्यंत शिरकाव झालेला नाही. २० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे आता चाळीसगावकरांनी मोकला श्‍वास घेतला असला तरी खबरदारी घेण्याची अत्यंत गरज आहे.

Deshdoot
www.deshdoot.com