त्र्यंबक बस स्थानक कात टाकणार; लवकरच अत्याधुनिक बसस्थानकाचे भूमिपूजन

त्र्यंबक बस स्थानक कात टाकणार; लवकरच अत्याधुनिक बसस्थानकाचे भूमिपूजन

नाशिक | प्रतिनिधी 

राज्यातील बसस्थानके स्वच्छ, सुंदर, आकर्षक असावीत, बसस्थानकांची वेगळी ओळख आणि प्रवाशांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत या यादृष्टीने राज्यातील बारा ज्योतिर्लिंगापैंकी एक असलेल्या त्र्यंबकेशवर येथील बसस्थानकाचा विकास केला जाणार आहे.

बस स्थानकांमधील स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, स्वछतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष लक्ष देऊन प्रवाशांच्या सेवेसाठी कार्य करावे, सर्व सुविधांनी युक्त अशा अत्याधुनिक बसस्थानकांचा आराखडा सादर करण्याचे निर्देश परिवहनमंत्री अनिल परब  यांनी नुकतेच दिले.

पहिल्या तीन डेपोंमध्ये त्र्यंबकेश्वर आणि दापोली यांच्या निवडीमागचे कारण हे आहे की ही दोन्ही ठिकाणं पर्यटन स्थळ आहेत. त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचा राबता असतो.

विमानतळावर असतात अशा व्हिडिओ वॉल, सोयी सुविधा, असलेल्या जमिनीचा व्यापारी उपयोग, स्वच्छ टॉयलेट्स आणि पिण्याचे पाणी. हे चित्र लवकरच महाराष्ट्रातील 150 च्या आसपास असलेल्या बस डेपोंवर दिसणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे बस डेपो अशाच पद्धतीने येत्या काही दिवसांमध्ये कात टाकणार आहेत.

या तीन डेपोंचे काम फेब्रुवारी महिन्यातच भूमिपूजन करून सुरुवात करण्यात येईल. अत्याधुनिक करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या 150 डेपोंची यादी आपण मागवली असून याच्यावरील काम नेमक्या कुठल्या मॉडेलवर करायचे आहे याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे परब म्हणाले.

डेपोमध्ये असलेल्या जमिनीचा व्यापारी उपयोग करण्यात येईल आणि डिजिटायझेशन च्या माध्यमातून लोकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा पर्यटक प्रयत्न असेल. विमानतळावर असतात असे गाड्यांच्या वेळापत्रका सह व्हिडिओ वन या डेपोंमध्ये असतील आणि प्रवाशांच्या सोयीसाठी स्वच्छ पायलट आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com