त्वरा करा : रेडमी 8A ड्युअल स्मार्टफोनचा पहिला सेल आज

त्वरा करा : रेडमी 8A ड्युअल स्मार्टफोनचा पहिला सेल आज

नवी दिल्ली :

शाओमीने लेटेस्ट रेडमी 8A ड्युअल स्मार्टफोनचा आज पहिला सेल सुरू झाला आहे. अधिकृत साइट आणि अँँमेझॉनवर हा सेल सुरू करण्यात आला असून या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स व डिस्काउंट दिले आहे. तसेच आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर 5 टक्के डिस्काउंट देत आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात हा फोन लाँच केला आहे.

हा फोन दोन पर्यायात उपलब्ध करण्यात आला आहे. २ जीबी रॅम आणि ३ जीबी रॅम असे हे पर्याय आहेत. २ जीबी रॅमच्या फोनची किंमत ६ हजार ४९९ रुपये इतकी आहे. तसेच ३ जीबी रॅम फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. फोनची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Mi.com आणि ऑनलाइन पार्टनर अँँमेझॉन इंडिया वरून होणार आहे. या फोनचा पहिला सेल १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. या फोनमध्ये ६.२२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वॉटरड्रॉप नॉच सह आहे.

फोनमध्ये २ जीएचझेड क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम आणि ३ जीबी रॅमच्या फोनमध्ये ३२ जीबीचा स्टोरेज मिळणार आहे. या फोनमध्ये व्हीओवायफाय फीचर देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये दोन रियर कॅमेरे दिले आहेत. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळणार आहे.

रियर कॅमेऱ्यात एआय सीन डिटेक्शन आणि एआय पोर्टेट मोडसह येणार आहे. फ्रंटच्या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. स्मार्टफोनची बॅटरी पॉवर फुल आहे. यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच १८ वॅटचा फास्ट चार्जर दिला आहे. यात रिवर्स चार्जिंगचे फीचर देण्यात आले आहे.

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com