बृहन्मुंबई महापालिकेच्या सेव्हेन हिल्स व कामगार विभागात ‘या’ जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महापालिकेच्या सेव्हेन हिल्स व कामगार विभागात ‘या’ जागांसाठी भरती

मुंबई | प्रतिनिधी 

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले असतानाच मनुष्यबळाची कमी भासू लागल्याने बृह्मुंबई महापालिकेच्या सेव्हेन हिल्स हॉस्पिटलमध्ये ५५० वेगवेगळ्या पदांची भरती होणार आहे. तर कामगार विभागात कक्ष परिचारक पदाच्या जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. महासंवाद या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर याबाबत या जागांची भरती करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हेन हिल्स हॉस्पिटलमध्ये विविध पदांच्या ५५० जागांची भरती

पदाचे नाव : वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार – ३० जागा

इंटेस्टिव्हीस्ट – (एमडी मेडिसिन १५)
ॲनेस्थेटिस्ट – (एमडी १०)
नेफ्रॉलॉजिस्ट – (डीएम ३)
कार्डिओलॉजिस्ट – (डीएम १)
न्युरोलॉजिस्ट – (डीएम १)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक/अतिविशेषकृत शाखेचा पदवीधारक आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल किंवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा नोंदणीकृत.

पदाचे नाव : सहायक वैद्यकीय अधिकारी – १२० जागा

एमबीबीएस – ६०
बीएएमएस – ३०
बीएचएमएस – ३०

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक/अतिविशेषकृत शाखेचा पदवीधारक आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल किंवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा अथवा योग्य संस्थेचा (आयुर्वेद व होमिओपॅथिक संस्थेचा) नोंदणीकृत असावा

पदाचे नाव : प्रशिक्षित अधिपरिचारिका – ४०० जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी पास,जीएनएम मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा पदवीधारक, नोंदणीकृत.

वयोमर्यादा : दि. १९ एप्रिल २०२० रोजी १८ ते ३२ वर्षे.
अर्ज करण्याचा व मुलाखतीचा पत्ता: अधिष्ठाता कार्यालय, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव, मुंबई.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागात कक्ष परिचर पदाच्या ११४ जागांची भरती

पदाचे नाव : कक्ष परिचर – ११४ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान एस.एस.सी. किंवा तत्सम परीक्षा १०० गुणांच्या मराठी
विषयासह उत्तीर्ण

वयोमर्यादा : दि. ३१ मार्च २०२० रोजी वय वर्षे १८ ते ३८ पर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १७ एप्रिल २०२० संध्याकाळी ६ वाजेपर्यंत

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/34Alyu4

अर्ज पाठविण्याकरिता ई-मेल : mcgm.wardboy@mcgm.gov.in

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com