क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी रवी महाजन; उपाध्यक्षपदी नरेश कारडा

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी रवी महाजन; उपाध्यक्षपदी नरेश कारडा

नाशिक l प्रतिनिधी

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी रवी महाजन यांची निवड झाली असून आज त्यांनी पदभार स्वीकारला.

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या नूतन पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी (दि.1) निवड करण्यात आली. यात मागील कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष असलेल्या रवी महाजन यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

उपाध्यक्षपदी नरेश कारडा यांच्यासोबत मागील कार्यकारिणीतील सरचिटणीस कृणाल पाटील यांना बढती देण्यात आली असून या कार्यकारिणीचे सरचिटणीस म्हणून गौरव ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे.

क्रेडाई नाशिक मेट्रोचे विद्यमान अध्यक्ष उमेश वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झूम कॉन्फरन्स बैठकीत ही निवड करण्यात आली.

या कॉन्फरन्समध्ये माजी अध्यक्षांसह ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते नूतन अध्यक्ष रवी महाजन यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला यावेळी कृणाल पाटील यांनीदेखील सरचिटणीस पदाचा पदभार गौरव ठक्कर यांच्याकडे सुपूर्त केला.

बांधकाम क्षेत्राच्या स्थैर्यासाठी करणार प्रयत्न
बांधकाम क्षेत्राला येत्या वर्षात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

ही बाब लक्षात घेऊन या क्षेत्राला स्थैर्य प्राप्त करुन देण्यासोबतच व्यवसायाला गती देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com