Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedरावेर तालुक्यातील दोन रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल

रावेर तालुक्यातील दोन रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल

रावेर – 

तालुक्यातील सावदा व वाघोदे खुर्द येथील रेशन दुकानदार ठरवून दिलेल्या भावापेक्षा जास्त दराने रेशन विक्री करत असल्याचे व कुटुंबात पाच सदस्य असल्यास त्यापैकी दोन जणांचे रेशन देत नसल्याचे प्रांत अधिकारी तहसीलदार यांनी केलेल्या पडताळणीत निदर्शनास आल्याने दोन्ही दुकानचालकांवर सवदा पोलिसात जीवनाश्यक वस्तू अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्यावरून गुन्हे नोंदवण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रांत अधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे,सावदा मंडळ अधिकारी शरीफ तडवी व तलाठी यांनी मंगळवारी सकाळी वाघोदा खुर्द येथील वसंत गणपत शिंदे व सावदा येथील काजीपुऱ्यातिल दुकान नं-१९ सुमन सुरेश बेंडाळे यांच्या दुकानावर जाऊन तपासणी केली असता ,

उपस्थित शिधा पत्रिका धारक याना पूर्णपणे धान्य वितरण न करणे व निर्धारित भावापेक्षा अधिक रक्कमेने धान्य पुरवठा करणे आढळून आल्याने पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही दुकान चालकांवर जीवनाश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच साथीचे रोग कलम १८९७ चे कलम३ भा.दं.वी.कलम १८८ व आपत्कालीन कायदा २००५ चे कलम ५६ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वाघोदा खुर्द येथील रेशन चालकांची विडिओ क्लिप व्हायरल

येथील एकाने वाघोदा खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानदार जास्त रकमेने आणि शिधा पत्रिका धारकांना कमी धान्य देत असल्याची व्हिडिओ क्लिप तयार करून व्हाट्स अँप वर व्हायरल केल्याने रेशन दुकानात सुरू असलेला अनागोंदी प्रकार चव्हाट्यावर आला होता, या नंतर संबंधितावर गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या