तोतया पोलिसांना ख-या पोलिसांनी दिला चोप
स्थानिक बातम्या

तोतया पोलिसांना ख-या पोलिसांनी दिला चोप

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

रावेर –
बऱ्हाणपूर अंकलेश्वर राज्य महामार्गावरील भोकरी फाट्यावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ तोतयेगिरी करणाऱ्या बनावट पोलिसांना ख-या पोलिसांनी चोप दिल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली.
धष्टपुष्ट शरीरयष्टी असलेल्या व्यक्तीने व त्याचा सहकारी असलेल्या पंटरने पोलिस असल्याची बनावटगिरी करून काही ट्रक चालक व मोटरसायकलस्वरांकडून अवैधरित्या वसुली करित होता.
कोरोना संचारबंदीचे उल्लंघन का केले, क्षमतेपेक्षा जास्त भार का वाहून नेत आहेत.व इतर कारणांवरून वसुली करीत होता.ते तोतया पोलिस असल्याची शंका काही नागरिकांना आली.नागरिकांनी या तोतयाला जाब विचारत ओळखपत्राची मागणी केली व पोलिस ठाण्यात जाण्याचे सांगितले.केळी वाहतूक करणाऱ्या वाहनांना शासनाने परवानगी दिली आहे.मग कशासाठी ट्रक अडवतात.अशी बाचाबाची झाल्या
नंतर रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या तोतया पोलिसाला चांगलाच चोप दिला.याबाबत रावेर पोलिसात नोंद झालेली नाही. ही घटना दि. २ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.घटनेच्या व्हिडीओ क्लिप व्हाट्स अॅपवर तालुका भरात फिरत आहे.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com