रावेर : क्वॉरंटाईन केलेल्या सात जणांचे पलायन
स्थानिक बातम्या

रावेर : क्वॉरंटाईन केलेल्या सात जणांचे पलायन

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

भुसावळ येथील रेल्वेत चहा विक्री करणाऱ्या एकास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचा निंभोरा (ता.रावेर)येथील १४ जणांशी संपर्क आल्याने,यातील ७ जणांना शहरातील कोविंड केअर सेंटर मध्ये क्वांरंनटाईन केल्याने त्यांचे स्वब नमुने घेण्यापूर्वीच,त्यांनी या ठिकाणाहून पळ काढल्याने रावेर ग्रामीण रुग्णालयाच्या तक्रारीवरून रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील सामाजिक न्याय वस्तीगृहात स्थापन झालेल्या तात्पुरत्या कोविंड केअर हॉस्पिटल मध्ये बुधवारी दुपारी निंभोरा येथील तीन पुरुष,दोन महिला,दोन मुले अशा सात लोकांना तपासणीसाठी आणल्याने त्यांचे स्वॅॅब नमुने घेण्यापूर्वी त्यांनी याठिकाणाहून पलायन केल्याने,रावेर ग्रामीण रूग्णालयाकडून दिलेल्या तक्रारीने रावेर पोलिसांत राष्ट्रीय आपत्ती कायदा मोडल्याने गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास महेंद्र सुरवाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com