रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सकडून कोरोना नियंत्रणासाठी ५ लाखांची मदत
स्थानिक बातम्या

रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सकडून कोरोना नियंत्रणासाठी ५ लाखांची मदत

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

घरातच थांबून सहकार्य करा – रतनलाल बाफनाजींचे आवाहन

संपूर्ण देशभरात सध्या कोरोना व्हायरसच्य संसर्गाचे थैमान सुरु आहे. या समस्येशी निपटारा करण्यासाठी भारतात २१ दिवसांचा लॉकआऊट सुरु आहे. आरोग्य सेवांसाठी सरकारी पातळीवर मोठा निधी खर्च होत आहे. कोरोना विरोधातील लढाईसाठी मुख्यमंत्री मदत निधीत देणगी देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स तर्फे ५ लाख रुपयांची मदत आज पाठविण्यात आली. फर्मचे संस्थापक तथा संचालक श्री. रतनलाल बाफना यांनी ही मदत रवाना केली.
कोरोना नियंत्रणासाठी सध्या जळगाव शहरातही लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे शहरातील रोजंदार, निराधार, वृद्ध आदींच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही स्वयंसेवी संस्था अन्न पाकिटे व शिधा वाटप करीत आहेत. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स संचालित अहिंसातिर्थ गोशाळेतही रोज २५० ते ३०० लोकांसाठी जेवण तयार करुन ते शहरातील गरजुंपर्यत पोहचविण्याचा निर्णय श्री. बाफना यांनी घेतला आहे. गोशाळेचे वाहनातून गरजुंपर्यंत जेवण पोहचवले जाणार आहे. या बरोबरच शहरातील मोकाट जनावरांसाठी चारा व मोकाट कुत्र्यांसाठीही अन्न दिले जाते आहे.
श्री. बाफना यांनी ध्वनीफितीच्या माध्यमातून जळगावकरांसाठी संदेश दिला आहे. कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सर्व आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस असे सर्वजण प्रयत्न करीत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. याशिवाय ज्या लोकांना जबाबदारी किंवा काम म्हणून घराबाहेर जाणे आवश्यक आहे त्यांनी योग्य ती खबदारी घेऊन बाहेर जावे. मात्र इतरांनी घरात बसून लॉकआऊटचे पालन करुन कोरोनाचा फैलाव होणार नाही याची काळजी घ्यावी असेही आवाहन श्री. बाफना यांनी केले आहे.
१० दिवस अगोदर वेतन
लॉकआऊटमुळे रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे राज्यातील ७ शोरुम सध्या बंद आहेत. अशा स्थितीत शोरुम व गोशाळेशी संबंधित जवळपास १३०० कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन किमान १० दिवस आधी देण्यात येत आहे. हे वेतन अदा करताना कर्मचाऱ्यांनी घेतलेली उचल कपात करु नये अशाही सूचना एचआर विभागाने दिल्या आहेत.
कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य
दरम्यान कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे एचआर विभाग प्रमुख श्री. मनोहर पाटील म्हणाले की, लॉकआऊटनुसार शोरुम बंद आहे. तरीही सर्वांचे वेतन ४/५ एप्रिलपूर्वी उद्याच बँकेत जमा होणार आहे. वेतन कपातच नव्हे तर कर्मचाऱ्यांची उचलही कपात करु नये अशा संचालकांच्या सूचना आहेत. यापूर्वीही विविध प्रकारच्या कायद्यांमधील बदलासाठी ४५ दिवस शोरुम बंद असतानाही कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले गेले होते. यासाठी भाईसाहेब तथा श्री. रतनलाल बाफना हे स्वतः लक्ष घालतात, असा आवर्जून उल्लेख श्री. पाटील यांनी केला.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com