त्र्यंबकेश्वरमध्ये अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार; ॲट्रॉसिटीसह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वरमध्ये अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार; ॲट्रॉसिटीसह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

त्र्यंबकेश्वर येथील इंदिरानगर परिसरात अल्पवयीन असलेल्या दिव्यांग मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मुलीच्या आजीने या घटनेसंदर्भात तक्रार दिली असून, त्यानुसार २७ वर्षीय संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी घराच्या बाहेर बसली होती. यावेळी संशयिताने तिला काम असल्याचे सांगत घरात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

दरम्यान मुलीच्या आजीने घरात विहकरापुरस केली असता तिला पीडित तरुणी दिसून आली नाही. यावेळी शोधाशोध करताना पीडित तरुणी घरी आली. यानंतर तिने घडलेला प्रकार आजीस सांगितल्या नंतर आजीने तात्काळ त्र्यंबकेश्वर पोलीसठाण्यात तक्रार दाखल केली.

यानंतर संशयितांविरुद्ध बलात्कार आणि ॲट्रॉसिटीसह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतल्याचे समजते. पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलिस करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com