Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमोदींच्या ‘सोशल’ संन्यासावर राज यांची दोन वर्षापूर्वीची पोस्ट व्हायरल

मोदींच्या ‘सोशल’ संन्यासावर राज यांची दोन वर्षापूर्वीची पोस्ट व्हायरल

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवर एक पोस्ट करत सर्वत्र खळबळ उडवून दिली. यानंतर अनेक चर्चांना उधान आले असताना  दोन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी मोदींवर आणि भाजपावर टीका करणारी पोस्ट चर्चेत आली आहे.

राज ठाकरेंनी 26 सप्टेंबर 2017 रोजी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली असून सर्वत्र चर्चांचे फड रंगले आहेत.

- Advertisement -

ठाकरे यांनी यामध्ये लिहिले आहे की, ‘भारतीय जनता पक्षाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरले होते तेच आता उगवले आहे. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मने कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचे अस्त्र भाजपने वापरले ते आता त्यांच्यावर बुमरँग झाले आहे.

निवडणूका जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासने दिली, लोकांची मने भडकवण्यासाठी खोट्याचे खरे करून दाखवले. आणि जे याला विरोध करत होते त्यांना ‘ट्रोल्स’ च्या माध्यमातून शिवीगाळ केली तसेच त्यांचे मानसिक खच्चीकरणदेखील केले.

हे सगळं करून सत्तेवर आल्यावर चांगले काम केले असते. लोकांची आश्वासने पूर्ण केली असती तर लोक हे सगळे विसरले असते मात्र तुम्ही सत्तेच्या मग्रूरीत निवडणुकीच्या काळांत दिलेली आश्वासने हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला ‘जुमला’ होता से जाहीर करून टाकले.  अशा आशयाची राज यांची पोस्ट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या