Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedशिरसोली रोडवरील जुगार अड्ड्यावर धाड

शिरसोली रोडवरील जुगार अड्ड्यावर धाड

15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव  – 

- Advertisement -

शिरसोली- कुर्‍हाडदे रस्त्यावरील एका शेतामधील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी धाड टाकली. यात जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आदी एकूण 31 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत एमआयडीसी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, कुर्‍हाडदे रोडवरील एस.पी.पाटील यांच्या शेतात झन्ना-मन्ना नावाच्या जुगाराचा अड्डा सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकली.

तेथे मनोज रामकृष्ण बारी, कृष्णा सोनवणे, राहुल ताडे, भूषण खलसे, सचिन बारी, विनोद मोरे, सुनील काटोले, बापू महाजन, शिवाजी बारी, शिवदास बारी, नंदलाल पाटील, राहुल बारी, महेश महाजन (सर्व रा.शिरसोली), तर धोंडू जगताप (बिलवाडी), गोरख केदारे (दापोरा) हे जुगार खेळताना मिळून आले.

आरोपींकडून 31 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या