स्थानिक बातम्या

भुसावळच्या ‘त्या’ रुग्णाला रेबीज

Balvant Gaikwad

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आज शुक्रवारी नव्याने 3 रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण 16 रुग्ण दाखल झाले होते, त्यापैकी 7 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. तर 2 सॅम्पलचे रिपोर्ट रिजेक्ट करण्यात आले. दरम्यान, भुसावळचा व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलेल्या रुग्णाला रेबीज झाल्याचे समोर आले आहे.

पुणे प्रयोग शाळेने सॅम्पलचे रिपोर्ट रिजेक्ट करण्याचे कारण परदेशातून आलेला नाही तसेच कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात नसल्याचे कारण सांगण्यात आले आहे. भुसावळच्या रुग्णाला रेबीज झाले होते, त्याला मुंबई येथील जेजे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

तर आजच्या दाखल रुग्णांमध्ये दी 6 रोजी दुबईहून आलेले दाम्पत्य आहे. दुसरा 70 वर्षीय पुरुष, तिसरा मुक्ताईनगरचा विद्यार्थी 17 काजकीस्थान येथून परत आला आहे. दुसरीकडे निगेटीव्ह आलेल्या रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे.

मात्र त्यांनी 14 दिवस घरीच थांबावे, असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे. दरम्यान जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नवीन 20 बेडची सोय केली करण्यात आली आहे. तर आजच्या परिस्थितीत एकूण 7 जण रुग्णालयात दाखल आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com