मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्याचे वातावरण पोषक; तपमान कमी होऊन अनेक भागांत पावसाची शक्यता
स्थानिक बातम्या

मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्याचे वातावरण पोषक; तपमान कमी होऊन अनेक भागांत पावसाची शक्यता

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पुणे | प्रतिनिधी 

मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्याचं वातावरण पोषक आहे. त्यामुळेच मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर आठ तारखेला राज्याच्या दक्षिण भागात मान्सून प्रवेश करेल. सोळा तारखेपर्यंत उत्तर भाग व्यापून टाकणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

२९ तारखेपासून राज्यातील तापमानात घट होणार. तर तीस तारखेपासून पुढील तीन दिवस राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. तीस तारखेनंतर मान्सून पूर्व हालचाली वाढण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे डॉक्टर अनुपम काश्यपी यांनी ही माहिती दिली.

विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तापमान ही खाली जाणार आहे.  पश्‍चिम भागातील हवा वाहू लागल्यानंतर पुण्यातील तापमान ४० अंश तापमान खाली येईल. तर  विदर्भातही ३० तारखेपर्यंत तापमान खाली येईल.  मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात २९आणि ३० तारखेला तापमान खाली येईल. तर शुक्रवारी आणि शनिवारी कोकण, गोव्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

तीस तारखेनंतर मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल.  कोकण गोव्यामध्ये मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

त्याचबरोबर ३१ आणि १ तारखेला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आणि कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.  रत्नागिरी-सिंधुदुर्ग भागात जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

तर पुणे आणि जिल्ह्यात तीस तारखेला दुपारनंतर विजांचा कडकडाट सुरू होईल. तीस तारखेनंतर तारखेनंतर पावसाला सुरुवात होईल. 31 मे आणि  एक ते  दोन जून रोजी पुण्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. 55 ते 64 मिलिमीटर एवढा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट होणार आहे. वाऱ्यामुळे झाडेही पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com