नाशकात उद्यापासून ३१ मे पर्यंत खासगी कार्यालये राहणार बंद
स्थानिक बातम्या

नाशकात उद्यापासून ३१ मे पर्यंत खासगी कार्यालये राहणार बंद

Dinesh Sonawane

file photo

नाशिक । प्रतिनिधी

लाॅकडाउन चार बाबत राज्य शासनाने नुकतेच नवे नियम घालून दिले आहेत. उद्यापासून ( दि.२२) हे नवे नियम लागू होत असुन रेड झोनमधील खासगी कार्यालये बंद ठेवण्याचा आदेश शासनाने शासनाने दिला आहे. जिल्ह्यातील नाशिक महापालिका क्षेत्र आणि मालेगाव महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये असून या ठिाकाणी खाजगी आस्थापनांना बंदी असणारा आहे. ३१ मे नंतर नव्याने याबाबत सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्य शासनाने राज्यात ग्रीन व आॅरेंज झोन रद्द केले आहेत. या पुढे रेड व नाॅन रेड झोन अशी विभागणी करण्यात आली आहे. रेड झोनमध्येच प्रतिबंधित क्षेत्र असणार आहे.

नव्या नियमानूसार नाशिक व मालेगाव महापालिका रेड झोनमध्ये आहे. तर उर्वरीत जिल्हा नाॅन रेड झोनमध्ये आहे. नवे नियम उद्या (दि.२२) आजपासून अंमलात येत आहे. त्यात काहि शिथिलता देण्यात येत असली तरी रेड झोनमध्ये खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानूसार जिल्हाधिकारि सूरज मांढरे यांनी ३१ मे पर्यंत रेड झोनमधील सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com