Video : नऊ मिनिटे घरात दिवे लावा; सोशल डीस्टन्सी राखण्याचा ‘हाच’ रामबाण उपाय : पंतप्रधान मोदी
स्थानिक बातम्या

Video : नऊ मिनिटे घरात दिवे लावा; सोशल डीस्टन्सी राखण्याचा ‘हाच’ रामबाण उपाय : पंतप्रधान मोदी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नवी दिल्ली : प्रतिनिधी 

येत्या रविवारी (दि. ५) रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातील लाईट्स बंद करून मेणबत्ती, टॉर्च, दिवा किंवा मोबाईलचे फ्लॅश लाईट लावा. जेव्हा चारही बाजूला सर्वजण दिवा लावतील तेव्हाच आपण सर्वजण या महाभयंकर कोरोनाशी एकत्रितपणे लढतो आहोत याची प्रचीती येईल. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. ते आज देशाला संबोधित करत होते.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीतरी मोठी घोषणा करतील अशी शक्यता होती. मात्र, यावेळी कुठलीही घोषणा केली नाही. सध्या लॉकडाऊन  सुरु आहे, यामध्ये सर्वात जास्त कामगार वर्गाला फटका बसला आहे. यावेळी त्यांची मदत केली पाहिजे. असे ते म्हणाले.

येत्या रविवारी म्हणजेच  ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातील सर्व लाईट्स बंद करून सर्वांनी जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यासाठी आम्ही १३० कोटी भारतीय एकत्रित लढत आहोत यासाठी घरामध्ये घराच्या बाल्कनीत, अंगणात मेणबत्ती, टॉर्च, दिवा किंवा मोबाईलचे फ्लॅश लाईट लाऊन प्रकाश निर्माण करायचा आहे.

यावेळी आम्ही एकत्रित या संकटाचा सामना करत आहोत असे यातून सिद्ध करावयाचे आहे. या आयोजनादरम्यान, कुणालाही, कुठेही एकत्रित यावयाचे नाही. आपल्या घराच्या अंगणात, बाल्कनीत हे करावयाचे असलायचे मोदी म्हणाले.  सोशल डीस्टन्सी राखण्याचा हाच रामबाण उपाय असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com