जळगाव : कुसुंबा शिवारात पोलिसांनी रोखला बालविवाह
स्थानिक बातम्या

जळगाव : कुसुंबा शिवारात पोलिसांनी रोखला बालविवाह

Balvant Gaikwad

नववधू अल्पवयीन मुलीची सुधारगृहात रवानगी

शहरापासून काही किलोमिटर अंतरावर असलेल्या कुसुंबा येथील गायरान शिवारात बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत हा विवाह रोखला. या प्रकरणी एकूण चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुसुंबा येथील गायरान शिवारात 15 वर्षीय बालिकेचा विवाह 21 वर्षीय तरुणासोबत होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना फोनद्वारे मिळाली होती.

त्या प्रमाणे लोकरे यांनी सहा.फौजदार रामकृष्ण पाटील, चंद्रकांत पाटील, हेमंत कळस्कर यांना पाठवून खात्री करण्यास सांगितले असता त्या ठिकाणी पवन पांडू भिल (वय 21) याचे लग्न एका अल्पवयीन मुलीशी होत असल्याचे निदर्शनास आले.

त्यावरून पोलिसांनी हा विवाह रोखत सुकदेव एकनाथ गायकवाड, राधाबाई तुकाराम गायकवाड, हौसाबाई दामू भिल, दामू पूना भिल यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून नववधू अल्पवयीन मुलीची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com