Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये करोनाबाधित पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू; आतापर्यंत ९० पेक्षा अधिक पोलिसांना करोनाची लागण

नाशिकमध्ये करोनाबाधित पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू; आतापर्यंत ९० पेक्षा अधिक पोलिसांना करोनाची लागण

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरातील पंचवटी विभागातील कोणार्क नगर भागात राहणाऱ्या एका करोना बाधित रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना या रुग्णाचा मृत्यू झाला झाला. आतापर्यंत नाशिक शहरात करोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील मृतांचा आकडा आता २०वर पोहोचला आहे.

- Advertisement -

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणार्क नगर येथील ५१ वर्षीय पोलीस कर्मचारी मालेगाव येथे ड्युटी केल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

२ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांना सौम्य लक्षणे आढळून आल्यामुळे करोना संशयित म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात दाखल करण्यात आले.

त्यांच्यावर डॉ चेवले यांनी ताबडतोब उपचार सुरु केले. ते उपचाराला प्रतिसाददेखील देत होते. मात्र, आज पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांना व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले. अखेर उपचारास त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यानंतर दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.

९० पेक्षा अधिक पोलीस करोनाग्रस्त 

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हॉटस्पॉट ठरले आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त पोलिसांची कुमक याठिकाणी कर्तव्य बजावत आहे. जवळपास आतापर्यंत मालेगाव शहरातील ९० पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या