Video : जे मानवतेची सेवा करतात तेच बुद्धाचे खरे अनुयायी – पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्थानिक बातम्या

Video : जे मानवतेची सेवा करतात तेच बुद्धाचे खरे अनुयायी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Dinesh Sonawane

नवी दिल्ली | प्रतिनिधी 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधत देशवासियांना संबोधित केले. आज बुद्ध पौर्णिमा आहे. जगभर बुद्ध जयंती साजरी करण्याचा दिवस आहे. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे हा उत्सव तंत्रज्ञानाचा वापर करून साजरी करावा लागतो आहे. आजच्या दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांतीचा संदेश दिला. भारत कठीण काळात जगाच्या सोबत असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

काय म्हणाले मोदी

 • कठीण काळात तुमच्या कुटुंबाची आणि आरोग्याची काळजी घ्या
 • आपले संरक्षण करा, तसेच दुसऱ्यांची मदतही करा
 • जेव्हा इतरांसाठी मनात करूणा असते, संवेदनशीलता असते, सेवाभाव असतो तेव्हा तुमच्यात कुठल्याही संकटाला सामना करण्याची ताकत येते
 • संकटाच्या या काळात नागरिकांचे जीवन वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत
 • भगवान बुद्धांचे एक एक वचन, एक-एक उपदेश मानवतेची सेवा करण्याचे आपले कर्तव्य
 • रुग्णालयापासून ते रस्त्यापर्यंत सर्वजण मानवतेच्या सेवेत व्यस्त आहेत
 • बुद्धाप्रमाणे आज अनेक लोक सेवा करण्यात व्यग्र झाले आहेत.
 • या संकटाच्या काळात लोकांना मदत करण्याची वेळ आहे
 • सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी नमन करतो
 • जे मानवतेची सेवा करतात तेच बुद्धाचे खरे अनुयायी असतात
 • आपण जे काही काम करत असाल ते सदैव निरंतर असल पाहिजे
 • भारताची प्रगती नेहमीच जगाच्या प्रगतीत सहाय्यक होतील
 • अशा कठीण काळात तुम्ही तुमच्या कुटुंबाची आणि आरोग्याची काळजी घ्या, आपले संरक्षण करा, तसेच दुसऱ्यांची मदत करा
 • संकटाच्या या काळात नागरिकांचे जीवन वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत
 • भगवान बुद्धांचे एक एक वचन, एक-एक उपदेश मावतेची सेवा करण्याची आपले कर्तव्य असल्याचेच जाहीर करते
 • रुग्णालयापासून ते रस्त्यापर्यंत सर्वजण मानवतेच्या सेवेला लागले आहेत
 • बुद्धाप्रमाणे आज अनेक लोक सेवा करण्यात व्यग्र झाले आहेत.
 • हताशा आणि निराशेच्या या काळात भगवान बुद्धाची शिकवण अधिक प्रासंगिक आहे
 • आज संपूर्ण जग संकटातून जात आहे.
 • या संकटाच्या काळात लोकांना मदत करण्याची वेळ आहे
 • सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी नमन करतो
 • जे मानवतेची सेवा करतात तेच बुद्धाचे खरे अनुयायी असतात
 • भारत संपूर्ण जगासोबत कोणताही स्वार्थ न ठेवता उभा आहे
 • आजच्या स्थितीत भगवान बुद्ध यांची शिकवण प्रासंगिक आहे
 • भारत या वेळी विश्वहितासाठी काम करत आहे आणि नेहमीच करत राहील

पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत आहेत

Deshdoot
www.deshdoot.com