Photo Gallery : ‘देशदूत’च्या महिला आरोग्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्थानिक बातम्या

Photo Gallery : ‘देशदूत’च्या महिला आरोग्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

येवला | प्रतिनिधी

‘देशदूत’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त येवला येथे आयोजित महिला आरोग्य महोत्सवाचे मान्यवरांनी कौतुक केले. येवला येथील कला वाणिज्य महाविद्यालयात महिला आरोग्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, नगरसेविका सरोजिनी वखारे, पं. स. सभापती कविता आठशेरे, बरह्म कुमारी परिवाराच्या नीता दीदी, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, ‘देशदूत’च्या जळगाव आवृत्तीचे संपादक हेमंत अलोने होते.

नामको हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांकडून विद्यार्थिनी व महिलांनी आरोग्य तपासणी करून घेतली. ‘देशदूत’च्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

‘देशदूत’चे येवला कार्यालय प्रमुख सुनील गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, समन्वयक दिलीप पाटील यांनी आभार मानले. यावेळी आयोजित बचत गटांच्या जत्रेचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. ‘देशदूत’कडून महाविद्यालयाला सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन भेट देण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com