पोलीस कॉलनीत पेट्रोलची चोरी; भुरट्या चोरास पोलीस पत्नींकडून चोप

पोलीस कॉलनीत पेट्रोलची चोरी; भुरट्या चोरास पोलीस पत्नींकडून चोप

file photo

नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण पोलीस दल रस्त्यावर उतरले असल्याची संधी साधत, चोरट्याने पोलीसांच्या हौसिंग सोसायटीत चोरीचा पेट्रोल चोरीचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न वसाहतीतील जागृत महिलांनी हाणून पाडत भुरट्या चोरास रंगेहात पकडून बेदम चोप देत पोलीसांच्या स्वाधिन केले.

अभिषेक राऊत (रा.मेडिकल कॉलेजजवळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी सदाशिव पाटील (रा.पोलीस हौ.सोसा.आडगाव शिवार) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांच्या सोसायटीत पेट्रोल चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. कोरोना या आजारामुळे संपुर्ण यंत्रणा कामाला लागल्याने पोलीस दल रात्रंदिवस रस्त्यावर आहे.

जगभरात लॉकडाऊन असल्याने पोलीस बंदोबस्तावर असल्याची संधी साधत संशयीताने गुरूवारी (दि.२) दुपारच्या सुमारास सोसायटीत पार्क केलेल्या एमएच ०९ एचडब्ल्यू ४४१२ व एमएच ०६ बीएफ ७५२९ या दोन वाहनांमधील पेट्रोल काढून तीसर्‍या वाहनातून पेट्रोल काढत असतांना तो सोसायटीतील जागृत महिलांच्या हाती लागला.

महिलांनी बेदम चोप देत त्यास आडगाव पोलीसांच्या स्वाधिन केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार वसंत पगार करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com