इंदिरानगर : राजीवनगर येथील अपघातात रिक्षातील प्रवाशाचा जागीच मृत्यू
स्थानिक बातम्या

इंदिरानगर : राजीवनगर येथील अपघातात रिक्षातील प्रवाशाचा जागीच मृत्यू

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

इंदिरानगर ‌| वार्ताहर

राजीवनगर येथे चारचाकी व रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि (२३) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भरधाव वेगात चारचाकी (क्र.एम एच 48 पी 5970 ) चालक जैनव नानकाणी रा तुपसाखरे नगर तिडके काँलनी यांनी समोरून येणाऱ्या रिक्षा (एम एच 15 झेड 8840) जोरदार धडक दिली.

या अपघातात रिक्षातील प्रवासी रामचंद्र कुलकर्णी (रा नवीन नाशिक) यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. त्यांना त्वरित उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याप्रकरणी कांतीलाल देविदास आहेरे (वय 58 रा तुळजा भवानी चौक पांगरे मळा नवीन नाशिक) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार भादवि कलम 279, 337, 338, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाकले अधिक तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com