Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक : तीन जवानांचे पॅराशूट निकामी; एक जवान बाभळीच्या झाडांत अडकला, शेतकऱ्यांकडून...

नाशिक : तीन जवानांचे पॅराशूट निकामी; एक जवान बाभळीच्या झाडांत अडकला, शेतकऱ्यांकडून मदत

नाशिक | प्रतिनिधी 

पॅराशूटमधून जमिनीवर इजेक्ट करताना देवळाली कॅम्पमधील आर्मीचे तीन जवान कॅम्पस सोडून भरकटले होते. यातील दोघे सुखरूप जमिनीवर आले तर एक जवान बाभळीच्या झाडामध्ये अडकला होता. या जवानास परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात देत सुखरूप काट्यातून बाहेर काढले.

- Advertisement -

आज सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास नाशिक पुणे रोडवरील टाकळी रोडवर ही घटना घडली. यावेळी मनीष काठे या तरुण शेतकऱ्याकडून सुखरूप बाहेर काढल्याची माहिती प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे.

भाबळीचे काटे अंगावर टोचल्यानं जवान किरकोळ जखमी झाला असल्याचे समजते. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले होते.

यानंतर बाभळीचे झाड पाडून जवानाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आर्मीचे जवान आणि वरिष्ठ अधिकारी  दाखल झाले. दैनंदिन सराव करत असतांना तीन पॅराशूट फेल झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती आर्मीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या घटनेतील दोघे जवान सुखरूप व मोकळ्या जागी रस्त्यापर्यंत आले तर एक जवान बाभळीच्या झाडावर अडकून किरकोळ जखमी झाल्याने त्यास अधिकारी घटनास्थळळावरून घेऊन गेले. .

- Advertisment -

ताज्या बातम्या