Video : पक्ष सोडणार नाही; शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी काम करणार – पंकजा मुंडे
स्थानिक बातम्या

Video : पक्ष सोडणार नाही; शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी काम करणार – पंकजा मुंडे

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

परळी | वार्ताहर

आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची जयंती. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेल्या त्यांच्या कन्या पंकजा मुंडे आज गोपीनाथगडावरून संबोधित करत आहेत. यावेळी राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर,विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाषा पटेल यांची प्रमुख उपस्थिती आहे.

पंकजा मुंडे यांनी भाजपा माझ्या बापाचा पक्ष आहे सांगत बंडखोरी करणार नसल्याचं जाहीर करत पक्षविरोधी भूमिका घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मन मोकळं केलं नाही तर शरीरात विष तयार होतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमत्त गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी समर्थकांशी संवाद साधत जोरदार भाषण केलं. गोपीनाथ मुंडेंचा प्रवास मृत्यू नंतरही कायम आहे ही किमया आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं. सामान्य माणसाचा, वंचितांचा नेता म्हणू त्यांच्याकडे आजही आदराने पाहिलं जातं असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

मी पक्ष सोडणार नाही. पक्षाला मला सोडायचं असेल तर ते खुशाल निर्णय घेऊ शकतात. मी राज्यभर दौरा करणार. मी वज्रमूठ खरणार. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार,” असं पंकजा मुंडे यांनी यावेळी जाहीर केलं.गेले १२ दिवस टीव्ही लावला तर रोज संजय राऊत दिसायचे.

ते जे बोलले ते करुन दाखवलं. पण मी मी काही बोलले नाही तरी माझंच नाव दिसायचं असं सांगत यावेळी त्यांनी पंकजा विषयी चांगलं नाही बोललं पाहिजे यासाठी काही लोकांना नेमलं होतं असा आरोप केला. तसंच सुत्रांची खिल्ली उडवताना, “इतके हुशार सूत्र असतील तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी कळला कसा नाही. सुत्रांचीही मर्यादा असते,” असं म्हटलं.

गेल्या १२ दिवसांपूर्वी म्हणजेत 1 डिसेंबरला  पंकजा मुंडे यांनी एक फेसबुकला पोस्ट अपडेट केली होती. त्यानंतर पंकजा मुंडे लोकनेते मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी मनसोक्त बोलेल…

जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय… तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे? अशी भावूक पोस्ट अपडेट करून राजकीय वातावरणात खळबळ उडवून दिली होती.

पंकजा मुंडे यांचे संपूर्ण भाषण

आंदोलन करणार आपला हक्क मिळवणार – पंकजा मुंडे

गोपीनाथ मुंडे यांचे मुंबईतील कार्यालाय सुरु करून राज्यात दौरा करणार – पंकजा मुंडे

औरंगाबादमध्ये २७ जानेवारी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण… उपोषण कुणाच्याही विरोधात नाही – पंकजा मुंडे

आले ते मावळे उडले ते कावळे – पंकजा मुंडे

ज्याचा कुणी नाही त्याची मी आहे – पंकजा मुंडे

बंड केले नसते तर देश स्वातंत्र्य झाला असता का; बंड तर करावेच लागणार आहे…काम तर करावेच लागणार आहे – पंकजा मुंडे

लक्ष्मी नसेल तर समुद्रामंथन कडून काढावा लागतो – पंकजा मुंडे

भाजप माझ्या बापाचा पक्ष आहे – मुठभर लोकांच्या बापाचा पक्ष नाही – पंकजा मुंडे

देवा तुही जातीवादी झालास का रे…- पंकजा मुंडे

घर फुटल्याची वेदना मी भोगलेय – पंकजा मुंडे

भाजप राष्ट्रीय पक्ष आहे तो टिकवला पाहिजे – पंकजा मुंडे

पदामुळे माणूस मोठा होतो हे बरोबर पण पंकजा मुंडेला कुठल्याही अपेक्षा नाहीत – पंकजा मुंडे

मी बंड करणार हि पुडी सोडली कुणी – पंकजा मुंडे

माझी अपेक्षाच काही नव्हती, मी का बंड करेल ? – पंकजा मुंडे

गोपीनाथ मुंडेंनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही – पंकजा मुंडे

संघर्ष यात्रा काढली, गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न उराशी मी बाळगले होते – पंकजा मुंडे

पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांची कन्या आहे…पराभावासारख्या चिल्लर गोष्टीने खचणारी नाही – पंकजा मुंडे

एवढे सूत्र होते तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी कसा समजला नाही – पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांचे संपूर्ण भाषण

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा जयंती कार्यक्रम #Live @गोपीनाथगढ

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा जयंती कार्यक्रम #Live #गोपीनाथगड

Pankaja Gopinath Munde ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 11, 2019

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com