पंचवटीतील गुन्हेगारी काही कमी होईना; उदयनगरमध्ये गोळीबार
स्थानिक बातम्या

पंचवटीतील गुन्हेगारी काही कमी होईना; उदयनगरमध्ये गोळीबार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पंचवटी | प्रतिनिधी 

मागील भांडणाची कुरापत काढून पंचवटीत एकावर भर सकाळी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून संशयिताचा शोध सुरु आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरात मागील भांडणाच्या कुरापतीवरून एका युवकावर सकाळी दहा वाजेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला.

गोळीबारात पंचवटीतील मखमलाबाद रोडवर उदय नगर येथील किरण भडांगे याच्या हातावर गोळी लागली आहे. या घटनेत भडांगे गंभीर  जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपासकार्य सुरु आहे.

Deshdoot
www.deshdoot.com