पंचवटी : डोळ्यात मिरची पुड टाकून युवकाची लूट
स्थानिक बातम्या

पंचवटी : डोळ्यात मिरची पुड टाकून युवकाची लूट

Gokul Pawar

नाशिक। दुचाकीस्वारास अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून मारहाण करून त्यांच्याकडील रोकड व सोन्याची चैन हिसकावून टोळक्याने पोबारा केल्याची घटना रविवारी (ता.8) रात्री पंचवटीत घडली.

नितीन धोत्रे, संतोष पवार, शंकर पवार, दीपक धोत्रे, कैलास येवले, पिंटू येवले अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी सुनील पवार (रा. कर्णनगर, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री ते त्यांच्या मित्रासमवेत दुचाकीवरून जात असताना संशयितांनी त्यांना अडविले आणि त्यांच्या डोळ्यात मिरची पुड फेकली.

त्यानंतर लोखंडी रॉड व दगडांनी मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर त्यांच्याकडील सॅमसंगाच 10 हजार रुपयांचा मोबाईल व गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक कासर्ले हे अधिक तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com