Thursday, April 25, 2024
Homeनाशिककरोनामुळे अवयवदानाचा यज्ञ ‘लॉकडाऊन’; प्रत्यारोपण शस्रक्रिया बंद; अवयदानाची इच्छा अपूर्ण

करोनामुळे अवयवदानाचा यज्ञ ‘लॉकडाऊन’; प्रत्यारोपण शस्रक्रिया बंद; अवयदानाची इच्छा अपूर्ण

नाशिक । कुंदन राजपूत

करोना संकटामुळे अवयव दान प्रक्रिया मागील फेब्रुवारी महिन्यापासून बंद आहे. करोनामुळे रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेवर बंदी आहे. अवयवांची गरज असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रिये दरम्यान करोनाची लागण होऊ नये यासाठी मेजर शस्त्रक्रिया करु नये, असे आदेश शासनाने जारी केले आहेत. अवयवदान प्रक्रिया ठप्प असल्याने किडनी, हृदय, जठर या अवयवांची नितांत गरज असलेले शेकडोे रुग्ण आज जीवन मरणाच्या रेषेवर उभे आहे. एकटया नाशिकमध्ये शंभरहून अधिक रुग्णांना किडनीची गरज आहे. एकूणच करोना संकटाचा अवयव दान चळवळीला फटका बसला आहे.

- Advertisement -

देशात झोनल ट्रांसफर कमिटी व ऑल इंडिया ऑरगन ट्रांसफर कमिटी यांच्यामार्फत अवयव दान प्रकियेचे मॉनिटरींग केले जाते. मात्र, फेब्रुवारीमध्ये करोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यानंतर शासनाच्या आदेशानूसार देशात अवयव दान प्रक्रिया काही दिवस स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच लॉकडाऊन सुरु असल्याने ब्रेन डेड व्यक्तिचे हदय, किडनी, फुफ्फुसे, लिवर हे अवयव गरजू रुग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रीन कॉरिडोर अथवा एअर कॉरिडोर करणे शक्य नाही. वरील अवयवांची गरज असलेल्या रुग्णांना इतर आजार देखील असू शकतात. त्यामुळे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते.

ते बघता अवयव प्रत्यारोपणाची मेजर शस्त्रक्रिया करताना रुग्णाला करोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू होण्याचा धोका लक्षात घेता रुग्णालयांमध्ये महत्वाच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सद्यस्थितीत टाळल्या जात आहे. सिजर, अपघातात गंभीर जखमी, मेंदू व जेथे जीव वाचवणे अत्यावश्यक आहे अशा शस्त्रक्रियांना परवानगी देण्यात आली आहे.

मृत्यूनंतर डोळे, त्वचा दान करण्यासाठी अनेकांनी फार्म भरले आहेत. मात्र, त्यापैकी काही जणांचे मृत्यू झाले असून करोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठि त्यांची अवयवदानाची अंतिम इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

अवयवदान व प्रत्यारोपण ही प्रक्रिया स्थगित असल्याने अवयवांची गरज असलेल्यांना त्याचा फटका सहन करावा लागत असून जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तिवर ते मृत्युची झुंज देत आहे.

करोनामुळे अवयवदान चळवळ सध्या थांबविण्यात आली आहे. किडनी, लिवर, हदय व इतर अवयवांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यास झोनल ट्रांसफर कमिटिची परवानगी नाही. एकट्या नाशिकमध्ये शंभरहून अधिक रुग्णांना किडनिची आवश्यकता आहे.

– डॉ.भाऊसाहेब मोरे, अवययदान चळवळीचे प्रणेते

अवयव दात्याची करोना चाचणी करणे व त्यांचे डोळे, त्वचा गरजुंना देणे हे आजच्या स्थितीत शक्य नाही. स्किन बॅकेकडे 300 हून अधिक व्यक्तिंनी अवयवदानाची इच्छा व्यक्त करत नोंदणी केली आहे. मात्र, त्यातील काहीजणांचे मृत्यू झाले असून करोनामुळे अवयवदानाची त्यांची अंतिम इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

– डॉ.राजेंद्र नेहते, संचालक,रोटरी – वेदांत स्किन बँक

- Advertisment -

ताज्या बातम्या