विरोधी पक्षाकडून ‘करोना’तही राजकारण – गृहमंत्री अनिल देशमुख
स्थानिक बातम्या

विरोधी पक्षाकडून ‘करोना’तही राजकारण – गृहमंत्री अनिल देशमुख

Balvant Gaikwad

जळगावात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली खंत

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  देखील राज्य शासनाची पाठराखण करीत सध्या राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे.

तरी देखील विरोध पक्षनेते देेवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी कोरोनाच्या या अतिशय नाजूक काळात राज्य शासनावर आरोप करुन राजकारण करीत आहेत. हे अत्यंत दुर्देवी आहे,

अशी खंत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. त्यांनी जळगाव दौर्‍यावर आल्यानंतर बुधवारी दुपारी अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

Deshdoot
www.deshdoot.com