नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली
स्थानिक बातम्या

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

जमाव बंदीचे आदेश दिल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वांनीच घराबाहेर पडणे टाळले आहे. याचा पडसाद नाशिकसह जिल्ह्यातील कांदा आवकेवर झालेला दिसून येत आहे. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आवक प्रचंड घटली आहे. व्यापारीदेखील कोरोनाच्या धसक्यामुळे बाजारसमितीमध्ये फिरकले नाहीत.

पिंपळगाव बाजार समितीमध्ये उद्यापासून बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे कांद्याची आवक नाही आणि व्यापारीही बाजारसमितीमध्ये फिरकले नसल्यामुळे बाजारभाव काहीसे कोसळले असल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे.

आज मिळालेल्या माहितीनुसार कांद्याचे दर ९०० रुपये ते १५०० रुपये प्रती क्वीटल दराने विक्री झाले. सरासरी १२५० रुपये इतका दर शेतकऱ्यांना मिळाला. यामध्ये जवळपास ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी बोलून दाखविली.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com