Thursday, May 9, 2024
Homeनाशिकदेवळयाच्या कांद्याची मोसमातील पहिली ‘परदेशवारी’

देवळयाच्या कांद्याची मोसमातील पहिली ‘परदेशवारी’

वाजगाव | शुभानंद देवरे 

केंद्र शासनाने निर्यात बंदी उठविल्याने देवळा तालुक्यातील कांदा थेट परदेशात विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. यामुळे शेतकरी वर्गाच्या आशा उंचावल्याने शेतकरी वर्गात बाजार भाव वाढणार अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. तसेच यंदाच्या मोसमातील देवळ्याच्या व्यापाऱ्याने पहिल्यांदाच कांदा परदेशात पाठविल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

- Advertisement -

एकीकडे अस्मानी संकटांची दोन हात करत कसेबसे कांदा पिक सांभाळत तयार केले तर दुसरीकडे शासने निर्यात बंदी घातल्याने शेतकऱ्यांना प्रचंड आशा असलेल्या कांद्याच्या भावाची घसरण झाल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.

उत्पादन खर्च निघत नसल्याने निर्यात सुरु करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर निर्यातबंदी उठविण्यात आली तसेच निर्यातशुल्कदेखील आवाक्यात आणल्याने व्यापाऱ्यांना परदेशात कांदा पाठविणे सहज शक्य झाले आहे.

दरम्यान,दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी दखल घेत शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेत पोहचवला, याबबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची प्रत्यक्ष भेट घेवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यानंतर गोयल यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन देत १५ मार्च पासून कांदा निर्यातीला हिरवा कंदिल दिला आहे.

त्यानुसार देवळा तालुक्यातील बालाजी कंपनीने कांदा विदेशात पाठवण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. नुकतेच २५० ते ३०० टन कांद्याची नेपाळ, बांगलादेश येथे पाठवून जैन पेटी व तुती कोरीन येथून दुबई, कोलोम्बो, ओमान, कतार आदि ठिकाणी निर्यात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

शासनाने पाच ते सहा महिन्या नंतर निर्यात सुरु झाल्याने व प्रथमच आपल्या देवळा तालुक्यातून कांदा विदेश जात असल्याने अन्य व्यापारी आपला मला विदेशात पाठवतील. या आशेने शेतकरी वर्गात मोठ्याप्रमाणात समाधानीचे वातवर निर्माण होऊन कांद्याचे बाजार भाव वाढणार असणार अशी आशा उराशी बाळगून आहेत.

बालाजी कंपनी वाजगाव यांच्या कांदा घेवून जाणाऱ्या वाहनांचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात वायरल होत आहे. सध्या देवळा तालुक्यात सर्वत्र बालाजी कंपनी यांचेच नांव चर्चेतून घेतले जात आहे.

शासनाने कांदा निर्यात सुरु केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानीचे वातावर निर्माण झाले, यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याल चांगला बाजारभाव मिळेल अशी आशा बाळगून आहे.

आनंदराव देवरे शेतकरी, वाजगाव

जेव्हा कांद्याला जास्त भाव होता तेव्हा शेतकऱ्यांकडे किरकोळ कांदा होता आता जास्त प्रमाणत कांदा आहे तर बाजार भाव नाही. निर्यात सुरु केल्याने बाजार भाव वाढावेत हीच  अपेक्षा.

संजय गायकवाड माजी व्हा.चेअरमन देवळा शेतकरी संघ

शासनाने निर्यात सुरु करण्यात संमती दर्शवल्याने आपण देवळा येथून कांदा परदेशात पाठवण्याची सुरुवात केली, ज्याप्रमाणे परदेशात कांद्याला मागणी वाढेल त्याप्रमाणात कांदा निर्यात होईल व त्याचप्रमाणत कांद्याचे बाजार भाव वाढू शकतात किंवा स्थिर नक्कीच राहतील.

धनंजय देवरे कांदा व्यापारी बालाजी कंपनी वाजगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या