केंद्रीय कृषी अधिकाऱ्यांची लासलगाव बाजारसमितीला भेट; कांदा साठवणूक निर्बंधाचा फेरविचार होणार?

केंद्रीय कृषी अधिकाऱ्यांची लासलगाव बाजारसमितीला भेट; कांदा साठवणूक निर्बंधाचा फेरविचार होणार?
लासलगांव | वार्ताहर
गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याची आवकेत दुपट्टी ने वाढ झाल्याने  केंद्र सरकारने व्यापाऱ्यांवर  लाादलेले कांदा साठवणुक निर्बंधांचा फेरविचार करावा याची वारंवार मागणी लासलगाव बाजार समितीच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.  याची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सहाय्यक संचालक संदीप कोते यांनी आज लासलगाव बाजार समिती भेट देऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी येण्याचा आणि नाफेडच्या कांदा साठवणुकीची माहिती जाऊन घेतले.
केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर घाउक व्यापार्याला 25 टन तर किरकोळ व्यापार्याला पाच टन असलेली मर्यादा उठवावी याकरिता बाजार समिती आणि व्यापारी वर्गाने शासनाकडे मागणी केली होती.
आज या पार्श्वभूमीवर  केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सहाय्यक संचालक संदीप कोते यांनी आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन कांदा आवक परिस्थितीची माहिती घेतली.
गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या दरामध्ये होत असलेल्या चढ-उतार ,बाजार समितित येत असलेली आवक याबाबत बाजार समिती व्यापारी आणि शेतकरी वर्गाची चर्चा करुन माहिती जाणून घेतले. यावेळी लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी कांदा साठवणुकीवर असलेली मर्यादा वाढवावी अन्यथा रद्द करावी अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकारने घाऊक व्यापाऱ्यांना 25 मेट्रिक टन तर किरकोळ व्यापाऱ्यांना २ मेट्रिक टन कांदा साठवणुकीची मर्यादा दिलेली आहे मुळात सध्या बाजार समिती म्हणते येणारा लाल कांदा याची 20 ते 25 दिवस टिकवण क्षमता असते.

कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकरी वर्ग अपरिपक्व कांदा विक्रिस आणत असल्याने त्याला वाळविणे, प्रतवारी करने,पॅकिंग करणे याला वेळ लागत असल्याने किमान तीन ते चार दिवस कांदा खळ्यावर  पडत आहे त्यामुळे साठवणुकीची मर्यादा आल्याने याचा थेट परिणाम हा कांदा खरेदीवर होणार आहे.


शेतकऱ्यांना दोन पैसे भेटत आहे तर भेटून द्या गेल्या तीन चार वर्षानंतर शेतमालाला समाधानकारक भाव मिळत आहे.

निवृत्ती न्याहरकर,शेतकरी


कांद्याचे वाढलेले तर लक्षात घेता शहरी ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून शासन कांदा बाजार भाव नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. ज्यावेळी कांदा हा मातीमोल भावाने विकला जातो त्यावेळी तुटपुंजी मदत देऊन पाने पुसली जातात. त्यामुळे शासनाने खाणाऱ्या बरोबर पिकवणारा याचाही विचार केला पाहिजे.

मंगेश गवळी, ब्राह्मणगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com